

yoga day आज जगभरात नववा International Yoga Day आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. ‘हर घर आंगण योग ‘ ही टॅगलाईन आयुष मंत्रालयाने निश्चित केली आहे. देशपातळीवर जबलपूर येथे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राज्यस्तरावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत योग दिनाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. तर जिल्हास्तरावर जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.21 जून हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. संपूर्ण जगभरात योग दिन साजरा व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे विद्यमान naredra modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव मांडला.
संपूर्ण जगभरात योगाचे महत्त्व आज पोहोचलेले आहे.सर्वाना उत्तम आरोग्य हवे तर योगा करण्याशिवाय पर्याय नाही.हे भारतातील लोकाना माहीत होते.कारण का तर योगाचे मूळ किंवा योग हाच भारतातील ऋषि मुनि यांच्या साधनेतून आकारास आला आहे.नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी योग ही भारतीय भूमीतील अनमोल विद्या आहे आणि ही विद्या संपूर्ण विश्वाच्या कामी आली पाहिजे. यासाठी 2014 साली सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी योग हा जर मानवी जीवन सुखकारक करण्यासाठी, वेगवेगळ्या आजारांवर मात करण्यासाठी उपयोगी पडत असेल तर तो योग केवळ भारतापुरता न राहता भारताबाहेर देखील जगभरामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे अशी भूमिका घेतली.म्हणूनच जगभरामध्ये जागतिक म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हावा. या विषयी विस्तृत असे विवेचन नरेंद्र मोदी यांनी आपल्या महासभेच्या भाषणात केले.भारत भूमीतील हे ज्ञान खरोखरच अगाध आहे म्हणूनच हे ज्ञान किंवा विद्या सर्वांना मिळायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक देशांना अगोदरच योग आणि त्याचे महत्त्व ज्ञात होते त्यामुळे अनेक राष्ट्रांनी जागतिक योग दिन साजरा व्हावा याला अनुमोदन दिले होते.
भारतामधील योग विद्या ही सर्व जगासाठी खुली झाली पाहिजे.सर्व जगभरातील लोकांनी याचा फायदा घेऊन आपले कल्याण केले पाहिजे.आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपले पाहिजे. याच भूमिकेतून संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक योग दिन साजरा करण्यात यावा याला परवानगी दिली. मात्र त्यासाठी कोणता दिवस निवडावा ? तर भारताने केलेल्या पाठपुराव्यामुळे योग दिनासाठी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय योग दिन किंवा जागतिक योग दिवस म्हणून निवडण्यात आला.21 जून का निवडण्यात आला?तर यामागे देखील एक शास्त्रीय कारण सांगितले जाते. 21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी दिवस उगवल्या पासून मावळे पर्यंत म्हणजेच अंधार पडेपर्यंत त्याचा कालावधी हा इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. योग करण्यासाठी,शुभ काम किंवा मोठे काम मोठ्याच दिवशी झाले पाहिजे. कदाचित याच भूमिकेमुळे 21 जून हा दिवस जागतिक योग दिन यासाठी निवडण्यात आला.
- या अर्थाने अशा क्रिया की जिच्या माध्यमातून शरीर आणि मन यांना जोडण्याचे काम केले जाते. आणि यालाच योग म्हणतात.
- शारीरिक भावनिक आणि मानसिक संतुलन राखून जीवन परिपूर्ण पणे कसे जगावे?आरोग्य उत्तम आरोग्य कसे प्राप्त करावे ?त्याचबरोबर आपली आत्म उन्नती कशी करावी?हे ज्यामुळे शक्य होते तो म्हणजे योग होय.
- योगाच्या माध्यमातून शरीराच्या उत्तम आरोग्याबरोबरच मनाचे आरोग्य आणि अध्यात्मिक प्रगती असे देखील अपेक्षित आहे.
- अजून सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शरीर आणि मन यांचा व्यायाम म्हणजे योग होय
-
1.भारताच्या प्राचीन ज्ञानाचा जगाला परिचय करुण देणे
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भारतातील योग विद्या ही खूप प्राचीन असून त्या विद्या च्या माध्यमातून आज देखील आपण आपले आरोग्य चांगले राहू शकतो थोडक्यात काय तर ज्ञानाच्या बाबतीमध्ये आम्ही भारतीय देखील किंवा आमची संस्कृती किती श्रेष्ठ आहे समजण्यासाठी जागतिक योग दिन महत्वाचा आहे.
-
योगाचे शारीरिक आणि मानसिक फायदे
भारतासाठी हा एक महत्त्वाचा क्षण मानला जातो, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे म्हणजे योग आणि त्याचे फायदे याबद्दल जागरूकता वाढवणे. योग हा एक सर्वांगीण अभ्यास आहे, जो शारीरिक मुद्रा, श्वासोच्छवासाची तंत्रे आणि ध्यान समाकलित करते. हे शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत या विश्वासावर आधारित आहे. दुस-या शब्दात सांगायचे तर, शारीरिक कल्याण हे केवळ शरीराचे नाही, तर मन आणि आत्म्याचेही आहे. योगाचा उद्देश त्याच्या विविध आसनांमधून मन आणि शरीर यांच्यात संतुलन निर्माण करणे आहे.
योगाचे शारीरिक फायदे असंख्य आहेत. योग लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि मुद्रा वाढविण्यात मदत करू शकतो. हे शरीरातील वेदना आणि जळजळ यांच्याशी लढते, रक्तदाब कमी करते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. हे वजन कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते आणि तुमचे फुफ्फुस मजबूत करते, ज्यामुळे श्वसनाचे आरोग्य चांगले राहते. योगासने अभ्यासकांच्या मानसिक आरोग्यासाठी देखील फायदे देतात.
नियमित श्वसन तंत्र आणि व्यायाम तणाव, चिंता आणि नैराश्याशी लढा देतात. हे आपल्याला शरीराला आराम देण्यासाठी तंत्रांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते आणि आत्म-जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते, ज्यामुळे चांगले लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता आणि संज्ञानात्मक कार्यामध्ये सुधारणा होते. हे सर्जनशीलता आणि उत्पादकता देखील प्रोत्साहन देते.
संधिवात, पाठदुखी आणि मल्टिपल स्क्लेरोसिस यांसारख्या दीर्घकालीन आरोग्य स्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी योग हे एक फायदेशीर साधन आहे. अधिक महत्त्वाचे म्हणजे, हा एक अभ्यास आहे जो कोणत्याही व्यक्तीच्या गरजा आणि क्षमतांनुसार सुधारला जाऊ शकतो.
म्हणून, वेगवेगळ्या वयोगटातील आणि शारीरिक क्षमतेच्या लोकांकडून याचा अभ्यास केला जातो. हे गट सामुदाईक रित्या किंवा वैयक्तिकरित्या अभ्यास करतात. घर असो किंवा स्टुडिओमध्ये, योग हा तुमच्या दैनंदिन जीवनात अंतर्भूत करण्याचा एक सोपा अभ्यास आहे.