Maharashtra Metro Rail Corporation Limited : इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्प कॉरिडोरला मिळाली मंजुरी

0

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited)
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

• ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
• प्रकल्पाची किंमत रु 12,200 कोटी
• 2029 पर्यंत प्रकल्प होईल कार्यान्वित
• रिंग कॉरिडोरची एकूण लांबी 29-किमी; ज्यामध्ये 22 स्थानके आहेत

नागपूर (Nagpur): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्प कॉरिडोरला मंजुरी प्रदान केली आहे. 29 किमी लांबीचा हा कॉरिडोर ठाणे शहराच्या पश्चिमेकडील परिसरात असेल ज्यामध्ये 22 स्थानकांचा समावेश आहे. सदर प्रकल्पाचे नेटवर्क हे एका बाजूला उल्हास नदी आणि दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान [SGNP] यांनी वेढलेले आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असून या परिसरात मेट्रो रेल प्रकल्पाची कनेक्टिव्हिटी सुलभ आणि सुविधाजनक वाहतुकीचे साधन प्रदान करेल ज्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूकीची कोंडी कमी होण्यास मदत मिळेल आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.

• प्रकल्प खर्च आणि निधी:
प्रकल्पाची अंदाजे किंमत रु.12,200.10 कोटी आहे ज्यामध्ये भारत सरकार (GOI) आणि महाराष्ट्र सरकारचा (GoM) समान वाटा आहे व द्विपक्षीय एजन्सीकडून अंशतः निधी घेतल्या जाईल. या सोबतच कॉर्पोरेट संस्थाकरिता स्टेशन नेमिंग,मालमत्तेचे मुद्रीकरण, व्हॅल्यू कॅप्चर फायनान्सिंग मार्ग यासारख्या नाविन्यपूर्ण पद्धतींद्वारे देखील निधी उभारला जाईल.

मोठ्या व्यावसायिक केंद्रांना जोडणारा कॉरिडोर कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गासाठी एक प्रभावी वाहतूक पर्याय प्रदान करेल. सदर प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून महत्वपूर्ण म्हणजे मेट्रो मार्गामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांना, विशेषत: विद्यार्थ्यांना आणि कार्यालयीन कामाच्या ठिकाणी दररोज प्रवास करणाऱ्यांना जलद आणि किफायतशीर वाहतुकीचे साधन उपलब्ध करेल.

या प्रकल्पामुळे 2029, 2035 आणि 2045 या वर्षांसाठी मेट्रो कॉरिडोरवर अनुक्रमे 6.47 लाख, 7.61 लाख आणि 8.72 लाख एवढी दैनंदिन प्रवासी संख्या असेल. महा मेट्रो सध्या नागपूर आणि पुणे मेट्रो रेल प्रकल्प राबवत असून ठाणे मेट्रोच्या रिंगसह महा मेट्रोने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे.

महा मेट्रो सिव्हिल, इलेवक्ट्रिक,मेकॅनिकल, इतर संबंधित कार्य आणि संबंधित मालमत्तांसह प्रकल्प कार्यान्वित करेल. महा-मेट्रोने याआधीच प्री -बीड कार्य आणि निविदा संबंधित कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. निविदा प्रक्रियेसाठी लवकरच करार केले जातील.