पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तातडीने मदत द्यावी; शेतकऱ्यांची मागणी

0

 

अमरावती -जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कपाशी, संत्रा, तूर, हरभरा, कांदा, गहू इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठवण्यात आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील नुकसान हे निरंक दाखवण्यात आलेले आहे. काल राज्य शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेला प्राथमिक नजर अंदाज अहवालामध्ये अमरावती जिल्ह्यातील नुकसान हे निरंक दाखवण्यात आले आहे. हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या अन्याय करण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांनी तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा लोकविकास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी, व झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.