

दिवाळी सण काही दिवसांवर आल्याने खासगी, सरकारी सर्वच बँकांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे. व्यापारी, नागरिक पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकांमध्ये आले आहेत. दिवाळीला मोठा खर्च केला जातो. लोकांचा बोनस आणि पगारही बँकांमध्ये जमा झालेला आहे. यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाणार आहे. अशातच बँका दिवाळी सुट्टीमुळे काही दिवस बंद असणार आहेत. (Insolvent bank closed for so many days; let’s do it today)
महाराष्ट्रातील बँका १ नोव्हेंबर, २ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर(रविवार) अशा सलग तीन दिवस बंद असणार आहेत. ३१ ऑक्टोबरला दक्षिण भारतातील तसेच उत्तर भारतातील बँकांना सुट्टी आहे. तर इतर राज्यांत १ ते ३ नोव्हेंबर सुट्टी देण्यात आली आहे.
बँका बंद राहणार असल्याने अनेकांची भिस्त युपीआय, एटीएमवर राहणार आहे. काही राज्यांमध्ये ३१ ऑक्टोबर तर काही राज्यांत १ नोव्हेंबरला सुट्टी देण्यात आली आहे. दिवाळी २८ तारखेपासून सुरु होत आहे. या दिवशी वसूबारस असून २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी असणार आहे. ३१ तारखेला नरक चतुर्दशी आहे. या तिन्ही दिवशी महाराष्ट्रात बँका बंद नसणार आहेत.
Join our WhatsApp Group for every update :
31 ऑक्टोबरला दक्षिण भारतासह उत्तर भारतातील बँकांना सुट्टी आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 31 ऑक्टोबरला सुट्टी असेल. तर त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, मेघालयमध्ये 31 ऑक्टोबरला सुट्टी नसेल.