

नागपूर (nagpur), 17 ऑक्टोबर
यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम यांच्या जयंतीनिमित्त इनोव्हेशन डे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने “टेकिंग असिमेट्रीक बेट्स इन लाईफ” या विषयावर मेकॅनिकल विभागाच्या अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्सच्या स्टुडंट चॅप्टरने कार्यक्रम घेतला.
स्क्वेअरफीट9 आणि सी-वॉकरचे संस्थापक हिमांशू सेवालकर यांची प्रमुख पाहुणे होते. मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. जयंत गिरी, डॉ. आर.बी. चडगे आणि डॉ. एस.एस. चौधरी, डीन (ओबीई) यांची उपस्थित होती. वायसीसीई एएसएमई अधिकारी वेदांत लाखे, कमोद कोहोड आणि प्रथम थोरात यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
हिमांशू सेवालकर यांनी व्यवसाय सुरू करण्याच्या आणि वाढविण्याच्या प्रवासातील त्यांचे अनुभव सांगितले. त्यांनी उद्योजकांसाठी नवकल्पना, जोखीम घेणे आणि लवचिकता यांचे महत्त्व अधोरेखित केले. नवीन संधी निर्माण करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका आणि बदलत्या बाजारपेठेतील ट्रेंडशी जुळवून घेण्यासाठी उद्योजकांनी तयार राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
डॉ. जयंत गिरी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वेगाने विकसित होत असलेल्या व्यवसायाच्या वातावरणात नावीन्यपूर्णतेची गरज प्रतिपादित केली. डॉ.जयंत गिरी यांनी डॉ.ए.पी.जे. कलाम यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन आनंदी पिदडी व मधुरा वानखडे यांनी केले तर आभार मिष्टी चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.अजिंक्य एदलाबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली वायसीसीई एएसएमईच्या चमूचे सहकार्य लाभले.