

चंद्रपूर :- इनर व्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूरच्या वतीने चिचाला येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शिक्षकांचा सन्मान होय. या दिवशी २० शिक्षकांचा त्यांच्या प्रशंसनीय कार्याबद्दल प्रेमाचे प्रतीक, बॅज व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
क्लबच्या अध्यक्षा व मानसशास्त्रज्ञ सोनम कपूर यांनी विशेष मार्गदर्शन सत्र घेतले. त्यांनी शिक्षकांना कार्य-जीवन संतुलन या विषयावर मार्गदर्शन केले, तर विद्यार्थ्यांना नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे व आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे याबाबत महत्त्वपूर्ण शिकवण दिली.
शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले तसेच शिक्षण अधिक सुलभ होण्यासाठी पुस्तकेही प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला क्लबच्या अनेक सदस्यांची उपस्थिती होती. यामध्ये जिल्हा अध्यक्षा रमा गर्ग, सचिव शाहीन शफीक, प्रकल्प संचालक व क्लब प्रतिनिधी पूनम कपूर, खजिनदार सुनीता जैस्वाल, उपाध्यक्षा सीमा गर्ग, माजी अध्यक्षा उमा जैन व शकुंतला गोयल, तसेच इतर सदस्य मीरा अग्रवाल आणि भावना बुद्धदेव यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर होते — मुख्याध्यापक श्री. नामदेव असवले, शिक्षक श्री. प्रदीप टिपले, श्री. राहुल वैद्य व श्री. संजय निकेसर जुनघरे, उपाध्यक्षा संध्याताई ठाकरे, तसेच सन्मानित सदस्य पेंदोर ताई, निशाने ताई, प्रकाशभाई शेंडे आणि कैलास खुजे.
कार्यक्रमाचा समारोप शाळेतील शिक्षक व क्लब सदस्यांमध्ये नाश्ता आणि मिठाईचे वाटप करून करण्यात आला.