

नागपूर-अभिनेता सुशांतसिंह राजपूत Actor Sushant Singh Rajput याची व्यवस्थापक दिशा सालियान कथित आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याची हिवाळी अधिवेशनात मोठी चर्चा आहे. (Disha Salian Case)
गेल्या अनेक महिन्यांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून त्यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या एसआयटी चौकशीच्या शक्यतेमुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप आमदारांकडून सातत्याने याप्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी वर्षभरापूर्वी दिशा सालियानच्या मृत्यूच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दिशाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या पुन्हा चौकशीला विरोध केला होता. आदित्य ठाकरे दिशाच्या मृत्यूच्या वेळी कुठे होते? असा प्रश्न सातत्याने भाजप आमदारांनी उपस्थित केला होता. अशातच आता याप्रकरणी एसआयटी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार असल्याचे संकेत आहेत. आदित्य ठाकरे हे सध्या दुबईत असल्याची माहिती आहे.