भारताचा सर्वात मोठा एआय कॉन्क्लेव्ह ‘एआय मंथन

0

आयआयएम नागपूर येथे 12-13 जुलै रोजी आयोजन
20 वक्ते, 10 अभ्यासपूर्ण सत्रे

नागपूर(Nagpur), 05 जुलै 2024 :- विश्वमंथन रिसर्च फाऊंडेशनच्‍यावतीने येत्‍या, 12 ते 13 जुलै 2024 दरम्‍यान आयआयएम, नागपूर येथे भारतातील सर्वात मोठ्या एआय कॉन्क्लेव्ह ‘एआय मंथन – 2024’ चे आयोजन करण्‍यात आले आहे. सकाळी 9:00 ते संध्याकाळी 6:00 या वेळेत होणा-या या संमेलनात देशविदेशातील २० हून अधिक मान्यवर वक्‍ते सहभागी होणार असून विविध विषयावरील 10 हून अध‍िक अभ्यासपूर्ण सत्रे राहणार आहेत.

शासन, शिक्षण आणि धोरण यासह विविध क्षेत्रांतून 400 हून अधिक लोकांचा यात सहभाग अपेक्षित असून, कॉन्क्लेव्हचे उद्दिष्ट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनीय संभाव्यतेचा शोध घेणे, हे आहे.

अध्यात्मिक गुरू, लेखक आणि जागतिक वक्ते श्री एम यांच्‍यासह नॅसकॉम एआयचे प्रमुख व आयबीएमचे माजी कार्यक्रम संचालक अंकित बोस; एसएमएल जेन आय चे संस्थापक डॉ. विष्णुवर्धन पोगुनुलू; सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (सीएसआयएस) येथील यूएस इंडिया पॉलिसी स्टडीजचे अध्यक्ष जयंत कृष्णा; डेटा आणि एआय कन्‍सल्टिंगचे रोहित पांढरकर, आयआयटी बॉम्बेचे प्रा.गणेश रामकृष्णन; बुस्‍टेबलचे चे सह-संस्थापक गोपी कोटेश्‍वरम; टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे नागपूर केंद्र प्रमुख अरविंद कुमार; ऋषिहूड विद्यापीठाचे सह-संस्थापक आणि कुलगुरू शोभित माथूर; ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ मनुज जिंदाल; टायगर ॲनालिटिक्सचे संचालक श्री वल्लभ दीवी; रेवॉर्डवाईज डॉट को.चे सह-संस्थापक अभिषेक गुप्ता; आयआयएम नागपूरचे संचालक भीमराया मेत्री; चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानंद; झायला हेल्थच्या संस्थापक खुशबू अग्रवाल; गुगलचे समूह उत्पादन व्यवस्थापक ऋषी बाळ; ब्रेनसाइट एआयचे सह-संस्थापक आणि सीटीओ रिमझिम अग्रवाल; विंग कमांडर रोहन चांडक आणि जिंदाल ग्लोबल लॉ स्कूलचे सहाय्यक प्राध्यापक गौरव पाठक या अत्याधुनिक विषयांवरील चर्चेचे नेतृत्व करतील.

एआयच्या युगातील चेतना, भारतासाठी एआय धोरण तयार करणे, एआयमध्ये बौद्धिक संपत्ती नेव्हिगेट करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या विचारांना संबोधित करणे यासारख्या विषयांचा समावेश असलेल्या सत्रांसह एआय नवोपक्रमाच्या आघाडीचे अन्वेषण, सार्वजनिक क्षेत्रातील प्रशासनामध्ये एआयच्या भूमिकेचा अभ्यास, नाविन्यपूर्णतेला चालना, कुशल एआय मनुष्‍यबळ तयार करणे आणि भारतातील एआय संशोधनाचे भविष्य घडवणे, एआयसह एंटरप्रायझेस ऑपरेशन्स कसे बदलत आहेत त्‍याचा शोध घेणे आणि भारतातील एआय कंपनी Hanooman.ai चा प्रवास जाणून घेण्‍याची संधी मिळणार आहे.
आयआयएम नागपूर हे कार्यक्रमाचे व्‍हेन्‍यू पार्टनर असून माइंडयुअरलॉजिक हे मार्केटिंग पार्टनर आहेत. अधिक माहितीसाठी, aimanthan@manthanlive.com वर संपर्क साधावा किंवा https://aimanthan.in/ ला भेट द्यावी.