भारताचा अमेरिेकवर विजय, भारताची सुपर८ मध्ये धडक

0

टी-२० विश्वचषकातील भारत वि अमेरिका सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने अमेरिकेवर ७ विकेट्सने विजय मिळवत सुपर ८ मध्ये धडक मारली आहे.भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. भारताने बुधवारी अमेरिकेवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Nassau County International Stadium )अमेरिकेने १११ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने १८.२ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने सुपर८ फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. विराट कोहली पहिल्याच षटकात गोल्डन डकचा बळी ठरला. तर तिसऱ्या षटकात रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अमेरिकेचा महत्त्वाचा गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने या दोघांच्या विकेट्स आपल्या नावे केल्या.

न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी स्टेडियमवर भारत वि अमेरिका यांच्यात टी-20 विश्वचषकातील सामना खेळवला गेला. ज्यात भारतीय गोलंदाज आणि सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीसह भारताने विजय मिळवला.भारताने अमेरिकेवर ७ विकेट्सवर विजय मिळवत टी-२० विश्वचषकाच्या सुपर८ फेरीत धडक मारली आहे. सुर्यकुमार यादवचे संयमी अर्धशतक आणि शिवम दुबेसोबतची भागीदारी संघासाठी महत्त्वाची ठरली. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारासह मैदानावर टिकून राहत अर्धशतकी कामगिरी केली. तर शिवम दुबेने ३५ चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. या दोघांची भागीदारी भारताला विजय मिळवण्यात मोठी भूमिका बजावणारी ठरली. पॉवरप्लेमध्येच भारताने विकेट्स गमावल्या पण सूर्या आणि शिवमने मैदानावर कायम राहत चांगली कामगिरी केली.