

सोनरी पहाट द्वारे आयोजित फ्लॉलेस मिस, मिसेस, किड्स इंडिया फॅशन शो आणि बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड २०२४: एक भव्य कार्यक्रम
नागपूर:-सोनरी पहाट संस्थेच्या अध्यक्ष रेखा भोंगाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित फ्लॉलेस मिस, मिसेस, किड्स इंडिया फॅशन शो आणि बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड २०२४ हा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहाने संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूड अभिनेता सचिन दानाई, धर्मपेठ महिला बँकेच्या अध्यक्ष निलिमा बावणे, बिझनेस वुमन दीपावली चौधरी, मिस एलिझा बोरकुटे (येहिबा यिरे फाऊंडेशनच्या अध्यक्ष) यांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला, त्यात डॉ. निखिल काकानी, देवेंद्र तळेकर, माही पुरी, रितेश नायर, रोशनी हिरानवार, डॉ. संगीता कुडके, डॉ. सविता बेदरकर, आणि अल्पना धुवाधपार यांचा समावेश होता. सोबतच, सोनरी पहाटच्या ब्रँड अँबॅसडर अनुपा बदवाइक, जयश्री पजई, कनक पोहेकर, सरला फरकडे, संजीवनी चौधरी, डॉ. करिश्मा कांबळे, पनेरी धोंबळे, नंदकिशोर चौधरी, रोहिणी बदवाइक, पूनम आश्रंकार, वर्षा तिवाकर, आयेशा खान आणि सानिया खान यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या आयोजनात सपोर्टिंग पार्टनर म्हणून मल्याबार गोल्ड अँड डायमंड्स, एलजी, फ्लोरा मोमेंट्स, आर. के. हियरिंग, येहिबा यिरे फाऊंडेशन, सोनरुपम, सज सोनरुपम यांचा मोठा सहभाग होता. फॅशन शोसाठी आऊटफिट पार्टनर ड्रेसोमॅनिया, सरांकी, सखी, हेवन हब कलेक्शन आणि इश मणिया हे होते. तसेच, मीडियापार्टनर म्हणून देशोन्नती, शंखनाद आणि इंडिया फॅक्ट्स न्यूज यांनी महत्वाची भूमिका बजावली. मेकअप पार्टनर इसास अकादमीने शोमधील स्पर्धकांना आकर्षक बनवण्यात मोठी भूमिका निभावली.
फॅशन शोमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत स्पर्धकांनी सहभाग घेतला, त्यात मिस कॅटेगरीमध्ये शोच्या टॉपर प्रार्थना लांजेवार आणि जान्हवी मेश्राम होत्या, तर मिसेस कॅटेगरीमध्ये डॉ. रीती चौधरी यांनी टॉप पोझिशन मिळवली. किड्स कॅटेगरीमध्ये शिवांश सुरकर आणि अदिरा हे शो ओपनर होते, तर गौरी चौधरी ही किड्स कॅटेगरीची टॉपर ठरली.
फॅशन शोची कोरिओग्राफी कल्पना पारेत यांनी केली होती, तर परीक्षक म्हणून प्रार्थना मेश्राम, डॉ. रश्मी तिरपुडे, सोहेल शेख आणि अनुरिता ढोलकिया यांनी सहभाग घेतला होता. एकूण ५३ स्पर्धकांनी या शोमध्ये आपला सहभाग नोंदवला.
स्पर्धेत विविध कॅटेगरीत विजेते ठरले:
* मिस कॅटेगरीमध्ये आयुषी बोंडनसे विजेती ठरली, माही सांभारे पहिली रनर अप आणि साक्षी भेळावे दुसरी रनर अप ठरली.
* मिसेस कॅटेगरीत आयुषी मिश्रा विजेती ठरली, तर डॉ. दीपाली काकानी पहिली रनर अप आणि राधा रेवटकर दुसरी रनर अप ठरली.
* क्लासिक मिसेस कॅटेगरीत वर्षा भालमे विजेती ठरली, राजश्री ढोटे पहिली रनर अप आणि पुष्पा फुलमाली दुसरी रनर अप ठरली.
* किड्स कॅटेगरीत आरना पुरी विजेती ठरली, तर रोजी जीवटोडे पहिली रनर अप, स्मिरल गायकवाड दुसरी रनर अप, सावी देवळकर तिसरी रनर अप, मिथी सुपारकर चौथी रनर अप, आणि वैष्णवी शिर्घरे पाचवी रनर अप ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँकर मोनालिसा यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले, तर कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात मनीष पडोळे, शिल्पा मेश्राम, रीमा उके, सपना गायकवाड, स्मिता कौर, सारिका खडसे, शुभांगी गाडगे, सोनल महाकलकर, अंकिता भोंगाडे आणि संकेत यांनी मोलाचे योगदान दिले