

भारत चीन सीमा विवाद : भारत आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद आता अखेर संपला आहे. चीननेभारताशी ‘गस्त करार’ करण्यास सहमती दर्शवली आहे. दरम्यान, या गस्त करारानंतर भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लष्करप्रमुख म्हणाले की, या कराराला चीनने सहमती दर्शवली असून, सीमेवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे.
दोन्ही देशांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, चीन आणि भारताने सीमेशी संबंधित मुद्द्यांवर अनेक राजनैतिक आणि लष्करी चर्चा केल्या. आता दोन्ही बाजूंनी संबंधित विषयांवर एक ठराव केला आहे. चीन याची अंमलबजावणी करण्यासाठी भारतासोबत काम करेल.