२०२४ मध्ये इंडिया आघाडी 300 प्लस जागा जिंकणार – संजय राऊत

0

मुंबई – 48 पैकी ते 148 जागांवर ते देखील जिंकण्याचा दावा ते करतील त्यांचा सर्वे काय आहे हे सर्वांना माहित आहे.२०२४ मध्ये इंडिया आघाडी 300 प्लस जागा जिंकणार असा दावा सेना नेते  SANJAY RAUT  संजय राऊत यांनी केला. 26-11 चा हल्ला हा मुंबईवरील हल्ला नसून देशावरील हल्ला आहे. मुंबई विकलांग करण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय कारस्थान होते. मुंबई कमजोर करण्याचे प्रयत्न तेव्हा अतिरेकी, पाकिस्तानी यांनी केले,आता काही राजकीय लोकं करत आहेत. त्यांच्या हातात फार तर बंदुका नसतील किंवा बॉम्ब नाहीत.

मात्र, काहीही करून त्यांना मुंबई अस्थिर आणि विकलांग आणि कमजोर करून मुंबईचे महत्व कमी करायचे आहे. हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आज दिवस आहे.
मणिपूरमध्ये अजून देखील हल्ले सुरू आहेत, जम्मू मध्ये देखील परिस्थिती बिकट आहे. आज संविधान दिन आहे. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला संविधान मिळाले. मात्र,गेल्या दहा वर्षांपासून या संविधानाचं खाजगीकरण सुरू आहे.
संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संविधान वाचवण्याची जबाबदारी या देशाच्या प्रत्येक नागरिकांवर आहे. 2024 साली या देशाची राजकीय लढाई संविधान वाचवण्यासाठीच होईल. संविधान नसेल तर हा देश राहणार नाही.
मिझोरम मध्ये भारतीय जनता पक्ष जिंकणार नाही.मध्यप्रदेश, राजस्थान ,छत्तीसगड आणि तेलंगणा या ठिकाणी देखील मोदींची जादू चालणार नाही हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचा दारूण पराभव होणार आहे. भाजप विकासाच्या कामावर मत का मागत नाहीत.राम लल्ला मोफत दर्शन हे आपण दाखवण्यापेक्षा कश्मीरमध्ये कश्मीर पंडित यांची घर वापसी दाखवली असती तर हिंदुत्वावर मतं मागितली असती. राम लल्लाचे दर्शन मोफत हे आचारसंहिताच भंग आहे, निवडणूक आयोगाने ताबडतोब भाजपला नोटीस बजावल्या पाहिजे.
यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर मतं मागितली म्हणून त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. आज निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करत नाही. एकच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याआधी स्वतंत्र्यवीर सावरकर पण त्यांच्याबरोबर कोणाला स्वप्न पडत असेल त्यांची मानसिकता तपासा. शिंदे राजकारण ते करत नसून दिल्लीतील भाजपची लोकं त्यांना राजकारण करायला लावतात.
कुणाला कधी डेंग्यू होतो ,कोणी छातीत दुखतं तर कधी चालताना माणूस गडबडतो भविष्यात आधारासाठी काठी, कुबड्या येऊ शकतात.
यशवंत मनोहर बोलतात ते योग्य आहे, हिंदुत्व जे आहे ती आमची संस्कृती आहे ते आमचे राष्ट्रीयत्व आहे ही धर्मांधता नाही.प्रकाश आंबेडकर यांनी ल मुद्दा उपस्थित केला होतो ते देखील योग्य आहे.देश वाचवायचा असेल तर इंडिया आघाडीमध्ये सामील व्हावे लागेल यावर राऊत यांनी भर दिला.