

नागपूर (Nagpur)16 ऑगस्ट :- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर विभागीय कार्यालयात भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू व कौशल्य विद्यापीठाच्या दत्ताजी डिडोळकर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर चांदेकर यांची उपस्थित होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. चांदेकर म्हणाले की, “कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, अभ्यासक्रम पूर्ण करताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रशिक्षण मिळाल्याने उच्चस्तरीय मनुष्यबळ तयार होईल, ज्यामुळे त्यांना मदत होईल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था हे अध्यापन कौशल्य प्रदान करण्याचे कर्तव्य पार पाडत आहोत.
यावेळी सर्व अभ्यासक्रमांचे शिक्षक, हितचिंतक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात “सुशासन” या त्रैमासिकाच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशनही डॉ. चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय संचालक जयंत पाठक यांनी प्रस्ताविक केले तर अग्निशमन दल अभ्यासक्रमाचा विद्यार्थी लोकेश बाळ याने संचालन केले.