
Indefinite hunger strike by District Cheap Grain Shopkeepers
अमरावती, amrawati 6 जानेवारी :शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या अजूनही सोडविल्या नाही, असा आरोप करून दुकानदारांनी देशव्यापी संप पुकारला. या संपाचे पडसाद अमरावती शहरासह सर्वच तालुक्यात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघाने १ जानेवारी २०२४ पासून बंद पुकारला आहे. शुक्रवारी (दि.५) पाचव्या दिवशीही संप सुरूच होता. संपामुळे धान्य वितरण प्रणाली बंद आहे. तालुक्यात रेशन वाटप बंद असल्याने नवीन वर्षापासून अद्याप रेशन मिळाला नाही. त्यामुळे गरीबकुटुंबे चिंताग्रस्त आहेत.
ऑल इंडिया फेअर शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली तर्फे देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांचे एक जानेवारीपासून संप सुरू आहे. या बंदचे पडसाद अमरावती जिल्ह्यात उमटले. अमरावती जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने बेमुदत उपोषण करीत आहेत. शासनाकडून जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होणार नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा दुकानदारांनी दिला, बंद सुरू झाल्याने दर महिन्याला मिळणारे रेशन जानेवारी महिन्यापासून बंद झाले आहे.