अचूकता साध्‍य करण्‍यासाठी ड्रोनचा वाढता वापर

0

(Nagpur)नागपूर 22, एप्रिल 2025: तंत्रज्ञान अधिक युजर फ्रेंडली व्‍हावे, याउद्देशाने सतत प्रगती करून तंतोतंतपणा आणि अचूकता साधण्‍यासाठी आताशा ड्रोनचा वापर सातत्याने वाढत आहे, असे मत ड्राईड सर्वेअर प्रा. लि. वे संचालक गौरव ब्राह्मणकर आणि रौनक दातीर यांनी सांगितले.
टेक-नेक्स्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या ‘मॅपिंग द फ्यूचर: हाऊ ड्रोन एरियल इंटेलिजेंस हाऊ रीडिफाइनिंग एरियल इंटेलिजन्स’ या तांत्रिक सत्रात ते बोलत होते. हा कार्यक्रम एसटीपीएल, नागपूर येथे झाला.
ब्राह्मणकर आणि दातीर यांनी यावेळी ड्रोनचे विविध प्रकार आणि त्यांची उत्क्रांती यावर विस्‍तृत प्रकाश टाकला. त्यांनी “ड्रोन्सचे जनक” इस्त्राईलचे डॉ. अब्राहम करेम यांच्याबद्दल माहिती देताना अचूक शेती, खत फवारणी, आपत्ती नुकसान व्यवस्थापन, वन आरोग्य निरीक्षण, वन मॅपिंग आणि संरक्षण, खाण नियोजन, पवन टर्बाइन डिझाइन, पॉवर लाइन आणि ट्रान्समिशन तपासणी आणि रस्ते आणि रेल्वेसह पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरावर प्रकाश टाकला. सत्राचे सूत्रसंचालन टेक-नेक्‍स्‍टचे अध्‍यक्ष प्रवीण पंचभाई यांनी केले.