

नवी दिल्ली, 21 मे: दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Former Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia) यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू कोर्टाने 31 मे पर्यंत वाढ केली आहे. मनीष सिसोदिया हे तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर झाले होते.
राऊस एव्हेन्यू कोर्टातील न्या. स्वर्णकांता शर्मा यांच्या कोर्टाने 14 मे रोजी त्यांनी आप नेते, सीबीआय आणि ईडी यांच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकांवर आपला आदेश राखून ठेवला होता. अंमलबजावणी संचालनालयाने चर्चेदरम्यान असा युक्तिवाद केला होता की ते उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पुढील आरोपपत्रात आरोपी बनवेल. त्यानुसार 17 मे रोजी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal)यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आणि ‘आप’लाही आरोपी बनवले आहे.