

नागपूर:- गीत, संगीत, नृत्य यांचा अनोखा संगम असलेल्या ‘कला संगम’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भ परफॉर्मिंग आर्ट सेंटरचे उद्घाटन प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर व लायन्स क्लब ऑफ नागपूर युनिटचे अध्यक्ष सागर कोशनगुट्टुवार यांच्या हस्ते झाले.
लायन्स क्लब ऑफ नागपूर युनिटीच्या सहयोगाने सुरू करण्यात आलेल्या या आर्ट सेंटरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यांना मंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे, संयोजक श्रुती जैन यांनी सांगितले. विष्णू मनोहर व सागर कोशनगुट्टुवार यांनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय कार्यक्रमात रसिकांनी विविध कलाप्रकारांच्या फ्यूजनचा आस्वाद घेतला. सूरसाधना अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. निकिता, अवंती गुप्ता, अजिंक्य नांदे, भूषण जाधव-श्रुती जैन, स्वप्नील नांदे, सावी तेलंग, ग्रंथी, भूषण जाधव, श्याम जैन या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. अजय वेखंडे यांनी व्हॉयोलीन वादन, गौरी जिड्डेवार यांचे कथक नृत्य लक्षवेधक ठरले.
तबल्यावर पंकज यादव, कीबोर्डवर मंगेश पटले व अजित भालेराव, गिटारवर रितेश राजेश किलोर, ड्रम्सवर संजय बारापात्रे, ऑक्टोपॅडवर नंदू गोहाणे तर व्हॉयोलीनवर अजय वेखंडे यांनी छान साथ दिली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन रोहिणी नांदे व डॉ. ललित जैन यांनी केले. संजय भरडे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या सफलतेसाठी किशोर जवादे, कुणाल गडेकर, अश्विनी चौलवार, अजय डागा, अभिजित मुळे, राजेश किल्लोर, संजय पुल्लरवार, राजेश चौलवार यांचे सहकार्य लाभले.