छायाचित्र प्रदर्शनाचे 16 रोजी उद्घाटन

0

ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबतर्फे आयोजन

नागपूर (Nagpur), 14 ऑगस्‍ट
ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबतर्फे विश्व छायाचित्रण दिवस (19 ऑगस्‍ट)चे औचित्‍य साधून छायाचित्र प्रदर्शनीचे शुक्रवार, 16 ऑगस्‍ट 2024 पासून आयोजन करण्‍यात आले आहे. दर्डा आर्ट गॅलरीमध्‍ये रोजी दुपारी 3 वाजता पोलिस आयुक्‍त डॉ. रविंद्र सिंघल यांच्‍या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर व बंधन डिजिटल लॅबचे संचालक अबी बानी यांची प्रमुख उपस्थिती राहील.

छायाचित्रकारांसाठी वाईल्ड लाइफ, नेचर, ट्रेव्हल, फेस्टीवल आणि वेडिंग या विषयावर आयोजित करण्‍यात आलेल्‍या छायाचित्र स्पर्धेतील निवडक छायाचित्र येथे प्रदर्शित करण्‍यात येणार आहेत. 19 ऑगस्‍टपर्यंत 4.30 ते 6 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहिल. याशिवाय, फोटोग्राफी, व्हिडीयोग्राफी या विषयावर नि:शुल्क कार्यशाळा, चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले असून आलोक शेवडे, के. गणेश, समरेश अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभेल. प्रदर्शनीच्‍या समारोपीय कार्यक्रमाला डिस्ट्रीक्ट गवर्नर रोटरी 3030 राजेंद्र सिंग खुराना, खरे आणि तारकुंडेचे संचालक मल्हार देशपांडे, मे. अल्ताफ एच. वलीचे संचालक अनवरभाई वली यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे, अशी माहिती ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लबचे अध्यक्ष श्री गजानन रानडे यांनी दिली आहे. मोठ्या संख्‍येने प्रदर्शनी बघण्याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.

विठोबा इंडस्ट्रीज प्रा. लि., बंधन डिजीटल लॅब, विको इंडस्ट्रीज, विशाखा अॅलबम अँड फोटो बुक, के. गणेश एकेडमी, साई दृष्टी आय क्लिनिक, स्किन क्लिनिक, खरे अँड तारकुंडे, शॅडो फोटोग्राफी इंडिया प्रा. लि., पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री, वैष्णवी एल्बम मीडिया, मॅक्स मीडिया डिजिटल एल्बम, मिलिंद फ्रेम एंड प्रिंटिंग, स्व. बाबासाहेब नाहतकर स्मृति मे मोहन नाहतकर, श्याम एजेंसी, सौंदर्य संसार आणि सुमिता समीर कोलते यांचे सहकार्य लाभत आहे.