राष्ट्रपतीच्या हस्ते मेडिकल अमृतमहोत्सवाचे उदघाटन

0

नागपूर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आज दुपारी नागपूरला आगमन झाले. शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ आणि मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राज गजभिये यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शासकीय मेडिकल रुग्णालयाला अत्याधुनिक यंत्रणा उभारणीसाठी 550 आणि आयजीएमसी( मेयो) रुग्णालयाला 400कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली, यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व विदर्भात मोठी सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्णसंख्या लक्षात घेता बॉनमॅरो सुविधा, नवीन युनिट सुरू करण्यात यावे अशी भावना मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता राज गजभिये यांच्याकडे व्यक्त केली. या प्रसंगी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मृर्मु यांनी मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. आरोग्य सेवेत देशवासियांना मेडिकल रोल मॉडेल ठरावे अशा शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर देवदूत ठरले. आरोग्य सेवेतील या सर्वांचे मेहनततीमुळे 135 कोटी लोकसंख्येच्या या देशात मोठ्या संख्येने लोकांचे जीव वाचवले जाऊ शकले. या देशात डाक्टरांना देव मानले जाते त्यामुळे आपण मोठ्या धैर्याने गरीब, सामान्य लोकांचा उपचार करून त्यांना त्यांच्या त्रासापासून मुक्त करून आपली डॉक्टर म्हणून जवाबदारी चोख पाळावी अशी अपेक्षा देखील महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मृर्मु यांनी व्यक्त केली.
शासकीय मेडिकल कॉलेजच्या अमृत महोत्सवात चार मान्यवरांचा सत्कार, उदघाटन, टपाल तिकीट, सभागृहाचे लोकार्पणराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडले.