Highmast lighting launch :संत तुकाराम महाराज चौक येथे हायमास्ट लाईटचे लोकार्पण

0

आमदार सुधाकर (Sudhakar Adbale)अडबाले यांच्या हस्‍ते उद्‌घाटन

चंद्रपूर (Chandrapur) : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने स्थानिक विकास निधी २०२३-२४ अंतर्गत “संत तुकाराम महाराज चौक” येथे हायमास्ट लाईटचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला. संत तुकाराम महाराज चौक नामकरण कार्यक्रमात आमदार सुधाकर अडबाले यांनी मागणीनुसार तात्काळ शब्द दिला होता आणि आता त्याची पूर्तता केली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने जुन्‍या कुंदन प्‍लाझा चौकाचे नामकरण संत तुकाराम महाराज चौक असे करण्याबाबत ठराव घेतला होता. त्‍याचे नामकरण ऑक्‍टोबर २०२३ रोजी पार पडले. त्‍या कार्यक्रमात आमदार अडबाले उपस्‍थित होते. त्‍यावेळी त्‍यांनी दिलेला शब्‍द पाडून नागरिकांची लोकहिताची मागणी पूर्ण केली. बुधवारी सायंकाळी या हायमास्ट लाईटचे उद्‌घाटन आमदार अडबाले यांच्या हस्‍ते पार पडले.

यानंतर सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्‍थानी धनोजे कुणबी समाज मंदिरचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, अतुल देऊळकर, विनोद पिंपळशेंडे, कार्यकारी अभियंता भूषण येरगूडे, देवानंद वाढई यांची मंचावर उपस्‍थिती होती.

संत तुकाराम महाराज चौकातील हा हायमास्ट लाईट परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल. शैक्षणिक कामासोबतच सामाजिक कार्यासाठी निधी उपलब्‍ध करून देण्याचा मानस राहील, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी मत व्‍यक्‍त केले.

यावेळी कूसूम उदार, अरुण मालेकर, वासूदेवराव बोबडे, सुधाकर जोगी, प्रभाकर पारखी, विलास माथनकर, प्रा. रवी झाडे, दिलीप मोरे, विलास गौरकार, दीपक जेऊरकर, विजय भोगेकर, गिलोरकर, सुरेंद्र अडबाले, आस्तिक उरकुडे, अजय बलकी, डॉ. विजय हेलवटे, सतीश मालेकर, देवा पाचभाई, अनिल डहाके, अक्षय येरगुडे, भाविक येरगूडे, सौरभ बनकर आदींची उपस्‍थिती होती. संचालन प्रा. नामदेव मोरे यांनी केले.
आमदार सुधाकर अडबाले यांनी या विकासकामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.