चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व स्वयंचलित तपासणी केंद्राचे भूमिपूजन 19 एप्रिल रोजी

0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती

नागपूर /सावनेर (Nagpur)18 एप्रिल 2025:
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आणि स्वयंचलित तपासणी केंद्राचे भूमिपूजन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते शनिवार, 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 5.00 वाजता होणार आहे.

एम वझलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड सावरमेंढा तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथे होणा-या या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) राहतील. यावेळी राज्‍यमंत्री मा. डॉ. पंकज भोयर, मा. श्री. राम राज मिणा, अवर सचिव, भारत सरकार तसेच, मा. आ. श्री. आशिष देशमुख, मा. आ. श्री. विनोद अग्रवाल, मा. आ. श्री. विजय रहांगडाले, शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मा. श्री अनिल सोले, महाराष्‍ट्र राज्‍याचे परिवहन आयुक्‍त विवेक भिमनवार, मा. श्री. बबनराव भुयारकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन एम वझलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनीष वझलवार व अर्चना आशिष वांदिले यांनी केले आहे.