अमरावती जिल्ह्यात गुरुवारी ६७० किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

0

Inauguration 670 Kisan Samriddhi Kendras Amravati district

26MREG53 अमरावती जिल्ह्यात गुरुवारी ६७० किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

अमरावती, 26 जुलै (हिं.स.)

भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या ‘अमृत काळात’ चहूबाजूंनी देश विकासाचा समृद्धपथ पादाक्रांत करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कना असलेला देशातील शेतकरी सुद्धा या विकासयात्रेचा साक्षीदार असायला हवा, तो मुख्य प्रवाहात येऊन प्रवाही व्हायला हवा. असे मत आमदार प्रवीण पोटे व भाजप शहर अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले

उद्या २७ जुलैला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे राजस्थान येथील सिकोर येथून देशभरातील १ लाख २५ हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर भाजप च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना प्रवीण पोटे म्हणाले कि सुजलाम, सुफलामतेच्या दिशेने शेतकऱ्यांनी प्रवास करावा याकरिता देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी हे आपल्या कर्तव्याशी प्रतिपद्धता जोपासत त्यांच्याकरिता कृषी क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करून देत आहेत. याच क्रमात शेतकऱ्यांची शेतीसाहित्य, कृषी निविष्ठा, नवनवीन तंत्रज्ञानावर आधारीत शेतीविषयक माहितीची आदान-प्रदान, त्यांच्या मालाची सुरक्षितता, पाश्चत्य देशात विकसीत होत असलेले अत्याधूनीक तंत्रज्ञान, शेतकरी जागृकता, मार्गदर्शन, दळवणवळनाच्या पुरेशा सोईसुविधा आदी बाबी लक्षात घेता त्यांची यासाठी, यापुढे गैरसोय होऊ नये म्हणून या संपूर्ण प्रश्नांवर एकाच ठिकाणावरून उत्तर मिळवता यावे, शेतकऱ्यांना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. जेथून शेतकऱ्यांना उपरोक्त सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यानुषंगाने 27 जुलै रोजी राजस्थान येथील सिकोर येथून देशभरात 1 लाख 25 हजार अशा ऐतिहासिक ‘पीएमकेएस’ केंद्रांचा शुभारंभ होत आहे.यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १४३० कृषी केंद्राचे उद्या उदघाटन होणार आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये ६७० केंद्रे राहणार असून अमरावती शहरात ६४ कृष्ण केंद्रे राहणार असल्याचे पोटे यांनी सांगितले यावेळी किरण पातुरकर ,जयंत डेहनकर शिवराय कुळकर्णी, प्रा रवींद्र खांडेकर,मंगेश खोंडे,मिलिंद बांबल,सुनिल साहू, उपस्थित होते.