

सचिन अग्रवाल अध्यक्ष, विनोद गुप्ता सचिव
नागपूर(Nagpur) ८ जुलै :- लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरच्या ६८व्या कार्यकारिणीचा शपथ ग्रहण समारंभ नागपुरातील हाॅटेल एअरपोर्ट सेंटर पाॅईंटच्या सभागृहात नुकताच थाटात पार पडला.
लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरचे नूतन अध्यक्ष सचिन अग्रवाल(Sachin Agarwal), सचिव विनोद गुप्ता(Sachin Vinod Gupta), कोषाध्यक्ष किशोर भैय्या आणि कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांना यावेळी प्रमुख अतिथी व लाॅयन्स क्लबच्या छत्तीसगड ३२३सी प्रांताचे
माजी प्रांतपाल प्रिथपाल बी. एस. बाली यांनी पदाची शपथ दिली.
लाॅयन्स क्लबचे मावळते अध्यक्ष नितीन वर्मा, प्रिती भैय्या, रजनीश जैन, नूतन सचिव विनोद गुप्ता, कोषाध्यक्ष किशोर भैय्या, लाॅयन्स क्लबचे झोन चेअरपर्सन महिंदरपाल सिंग, रीजनल चेअरपर्सन नितीन लोणकर आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीतील राजेश जिंदल, रविंदरसिंह खुराणा, विनीत सोंधी, प्रकाश वाघमारे, नंदकिशोर अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, निधीश सावरकर, रवी किशनपुरिया, रजनीश जैन, डॉ. पल्लवी भगत, सी. जे. ठक्कर, जयप्रकाश गुप्ता, संजय गुप्ता, सुनील कुहीकर, चेतन मारवा, विजय फरकासे, उमेश महतो यांनाही यावेळी पदाची शपथ देण्यात आली.
राष्ट्रगीताने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात मावळते अध्यक्ष नितीन वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रिती भैय्या यांनी मागील कालावधीत झालेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. नवीन वर्षासाठी ठरवण्यात आलेल्या ई-वेस्ट या टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन व पुनर्वापर प्रकल्पाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन चेतन मारवा यांनी केले, तर आभार विनोद गुप्ता यांनी मानले.