

In the name of pilgrimage, 35 elderly people were अमरावती (Amravti), 28 जुलै यात्रा कंपनी चालविणाऱ्या दोन भामट्यांनी ३५ वृध्दांना तीर्थयात्रेवर नेण्याचे आमिष देऊन सुमारे ३ लाखा पेक्षा जास्तची रक्कम हडपली. तसेच पावसामुळे परवानगी मिळाली नसल्याने यात्रा रद्द झाल्याचे सांगून दोन्ही ठगबाज फरार झाले. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात ही घटना घडली असून याबाबत पोलिसांनी दोन ठगबाजांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
सतीष काजे, रा.न्यू गणेश कॉलनी, राजु अटाळकर, रा. माहुली धांडे असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. काशिनाथ महादेवराव काकड (६४) रा. आकांक्षा विहार, जुना बायपासरोड, अमरावती यांच्या तक्रारीवरून सतीष काजेवर व राजू अटाळकर महिलेच्या याच्यावर तक्रारीवरून फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, आरोपी सतीष काजे हा वृध्दांसाठी तिर्थयात्रेचे आयोजन करतो. १३ नोव्हेंबर २०२३ ला काशिनाथ काकड यांची कुणाच्या तरी माध्यमातून सतीष काजेसोबत ओळख झाली. सतीषनेत्यांना १३ हजार रूपयात आठ दिवसाच्या तिर्थयात्रोचा प्लान (Pilgrimage plan)समजावून सांगितला.
यात्रा कंपनी चालविणाऱ्या दोन भामट्यांनी ३५ वृध्दांना तीर्थयात्रेवर नेण्याचे आमिष देऊन सुमारे ३ लाखा पेक्षा जास्तची रक्कम हडपली. तसेच पावसामुळे परवानगी मिळाली नसल्याने यात्रा रद्द झाल्याचे सांगून दोन्ही ठगबाज फरार झाले. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात ही घटना घडली असून याबाबत पोलिसांनी दोन ठगबाजांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. सतीष काजे, रा.न्यू गणेश कॉलनी, राजु अटाळकर, रा. माहुली धांडे असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. काशिनाथ महादेवराव काकड (६४) रा. आकांक्षा विहार, जुना बायपासरोड, अमरावती यांच्या तक्रारीवरून सतीष काजेवर व राजू अटाळकर महिलेच्या याच्यावर तक्रारीवरून फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, आरोपी सतीष काजे हा वृध्दांसाठी तीर्थयात्रेचे आयोजन करतो. १३ नोव्हेंबर २०२३ ला काशिनाथ काकड यांची कुणाच्या तरी माध्यमातून सतीष काजेसोबत ओळख झाली. सतीषनेत्यांना १३ हजार रूपयात आठ दिवसाच्या तिर्थयात्रोचा प्लान समजावून सांगितला.
काशिनाथ हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असल्याने त्यांची बरीच ओळख होती. त्यामुळे काशिनाथने सुमारे ३५ लोकांकडून तिर्थयात्रेच्या नावावर प्रत्येकी १० ते १३ हजार रूपये घेतले. परंतु, अचानक तीन महिन्यानंतर तीर्थयात्रा रद्द झाल्याचे सतीष काजे याने जाहीर केले आणि तो लोकांचे घेतलेले पैसे न देता फरार झाला. असाच प्रकार आरोपी राजू अटाळकर यांने महिलेसोबत केला. त्यामुळे दोघांनी याबाबत राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दोन्ही आरोपींविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल केले आहेत.