Bhishi Fraud :भिशीच्या नावाखाली लावला करोडोचा चुना?

0

पैसे वसुलीसाठी तरुणाच्या आईला आणि भावाला बांधून केली मारहाण..?

मनमाड (Manmad) ,18 जुलै – लालच बुरी बला है ही म्हण मनमाडच्या उच्चभ्रू व्हाईट कॉलर नागरिकांसाठी अत्यंत तंतोतंत लागू होताना दिसत आहे. मनमाड शहरातील एका तरुणाने शहरातील उच्चभ्रू व्हाईट कॉलर नागरिकांना लिलाव भिशी तसेच व्याजा पोटी जास्त रकमेचे आमिष दाखवून करोडो रुपयाचा अपहार करून पोबारा केल्याची घटना घडली. आपले पैसे मिळावे यासाठी शहरातील एका केटरर्स चालकाने संबंधित तरुणाच्या आई आणि भावाला उचलून आणले व ज्यांनी ज्यांनी पैसे घेतले त्या सर्वांनी मिळून त्यांना बेदम मारहाण करून पैसे वसूल करण्यासाठी आग्रह केल्याची घटना मनमाड शहरात घडली.

हे सर्व आर्थिक काम अनधिकृत म्हणजे इल्लीगल असल्याने याबाबत कोणत्याही प्रकारची पोलीस तक्रार करण्यात आली नसली तरी या घटनेत शहरातील अनेक मोठमोठे व्यापारी राजकीय नेते यांचे करोड रुपये अडकल्याची चर्चा शहरातील चहाचे दुकान व पान टपऱ्यांवर रंगू लागली आहे याबाबत पैसे दिलेल्या अनधिकृत सावकार तसेच ठेकेदार व नेते यांनी तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी भूमिका घेतली आहे.

मात्र या चर्चेने शहरात एकच खळबळ उडाली असून लालच करून आपले लाखो रुपये बुडाल्याचे दुःख मात्र या व्यापारी व राजकीय नेत्यांना सतावत आहे. शहरातील या सर्व सावकारांची चौकशी व्हावी व गोरगरीब जनतेला फसवणाऱ्यांना कठोर शासन करावे अशी देखील मागणी करण्यात येत आहे.

Commit frauds meaning
4 elements of frauds
Frauds meaning in law
Consequences of frauds
Types of frauds in law
Types of frauds in business
3 elements of frauds
List and describe the five different types of frauds