
नागपूर : प्रामाणिक नेतृत्व वन विभागाला सुधीर मुनगंटीवार यांच्या निमित्ताने लाभले, आम्ही आमदारांनी बदली प्रकरणात अनियमितता झाली ती त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी लगेच लक्ष घालून या आक्षेपार्ह बदल्यांना स्थगिती दिली असे मत शिंदे गटाचे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांनी व्यक्त केले.
जैस्वाल म्हणाले, बदलीचे अधिकार त्यांनी मंत्री म्हणून स्वतःकडे न ठेवता खाली दिले. पण यात पारदर्शकपणे सर्व व्हायला पाहिजे. अतिशय उत्तमपणे मंत्री म्हणून ते काम करत आहे. पण त्यांना खालील आधिकाऱ्यांनी काय केले हे लक्षात आणून देण्याचे काम आम्ही केले.पर्यटनासाठी बहुतांश गुंतवणूकदार मध्यप्रदेशला जातात ते महाराष्ट्रात राहिले पाहिजे, यासाठी कर्तबगार लोकांना योग्य ठिकाणी नियुक्ती मिळावी हे गरजेचे आहे, त्यासाठी या बदल्या योग्य होणे आवश्यक आहे, बदल्या स्वतः केल्या असत्या तर ही अडचण झाली नसती, सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री म्हणून स्वतःकडे अधिकार ठेवले पाहिजे जेणेकरुन योग्य लोकांना योग्य जवाबदारी मिळेल.या बदली प्रकरणाची शहानिशा मंत्री सुधीर मुनगंटीवार करत आहे, त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय, मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी चांगला अधिकारी नेमल्या गेले पाहिजे अशी भूमिका आमदार आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केली.