नितीश कुमारांच्या विमानात लालूंचं पोरगं अन् गोंधळच गोंधऴ़़!

0

नितीश कुमारांच्या विमानात

लालूंचं पोरगं अन् गोंधळच गोंधऴ़़!

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या गोंधळात बुधवारी लालू प्रसाद यादव यांच्या मुलाने भर घातली़ दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी पाटण्याहून निघालेल्या एका खाजगी विमानात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समवेत लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव देखील स्वार झाले़. विमानात नितीश कुमार यांच्या मागे बसले असल्याची त्यांची छायाचित्रे देशभर व्हायरल झाली़त. ख़रंतर नितीश कुमार एनडीएच्या आणि तेजस्वी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी निघाले होते. पण या दोघांनी सोबत प्रवास करण्यावरून राजकीय गोंधळ निर्माण झाला. यातही तेजस्वी यादव यांनी अतिशय हुशारीने व्यवस्थितपणे संभ्रम निर्माण केला.

विमानातून उतरल्यावर, तुम्ही सोबत कसे, विमानात काय चर्चा झाली, नितीश कुमारांशी राजकीय वार्तालाप झाला का, अशा अनेक प्रश्नांवर नितीश कुमार तर उत्तर न देता स्मित हास्य करत निघून गेले, पण तेजस्वी यादव यांनी मात्र मिळालेल्या ‘संधीचे सोने’ करत या सर्व प्रश्नांवर संभ्रम निर्माण करणारी उत्तरे देत गोंधळ कायम ठेवला. सर्वच प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतात, मी तर काय नितीश कुमारांनी बोलावलं म्हणून त्यांच्या विमानात बसलो, वगैरे सारखी हुशारीची उत्तरं देत युपीए आणि एनडीए यांच्यात आधीच सरकार स्थापनेवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत आणि गोंधळात भर घालण्याचे काम तेजस्वी यादव यांनी केले. प्रत्यक्षात विमान तळावरून बाहेर पडल्यावर दोघेही आपापल्या दिशेने मार्गी लागले. नितीश कुमार एनडीएच्या तर तेजस्वी यादव युपीएच्या बैठकीत नंतर हजरही झाले. पण तत्पूर्वी या दोघांनी पाटना ते दिल्ली दरम्यान सोबत केलेल्या प्रवासाने देशात धमाल उडवून दिली़