मानकापूर परिसरात भीषण अपघात ट्रकने अनेक वाहनांना उडविले

0

 

  नागपूर(nagpur) – नागपुरातील मानकापूर रोड उड्डाणपूल(Mankapur Road Flyover)परिसरात रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एका भरधाव कंटेनर ट्रकने किमान पाच ते सहा वाहनांना धडक दिली.यात तीन-चार कार, दोन-तीन दुचाकी वाहनांचा आणि एका ऍम्ब्युलन्सचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. एक कार तर दुसऱ्या कारवर चढल्याचे पाहायला मिळाले, यामुळे छिंदवाडा रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली असून घटनास्थळी मोठा जमाव गोळा झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीसही पोहोचले आहेत. या विचित्र, भीषण अपघातात नेमके किती जण जखमी झाले याविषयीची माहिती सर्व भराभर वाहनातून बाहेर पडल्याने अद्याप कळू शकली नाही.