

-फडणवीस (Fadnavis)
नागपूर (Nagpur) -बहुचर्चित कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शिवसेना की भाजपच्या चिन्हावर या शब्दात विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. नागपुरात भाजपच्या स्थापना दिन कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते. गेले अनेक दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना व भाजपच्या दावेदारीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
अद्यापही शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याणची उमेदवारी जाहीर करता आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज हे केलेले विधान श्रीकांत शिंदे व त्यांच्या समर्थकांना दिलासा देणारे म्हणता येईल.
श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध होत आहे त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले,
भाजपाकडून त्यांच्या उमेदवारीला कुठलाही विरोध नाही. उलट श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत .भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी आमची महायुती श्रीकांत शिंदे यांना निवडून आणेल असा दावा केला.