
इस्लामाबाद Islamabad – तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान Imran Khan यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली. लाहोर पोलिसांनी PTI पीटीआयच्या अध्यक्षांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक केली. इस्लामाबादच्या ट्रायल कोर्टाने त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खान यांना पुढील 5 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. न्यायालयाने माजी पाकिस्तानी पंतप्रधानांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
अटक करण्यात आल्यावर इम्रान खान यांना लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात नेण्यात आले आहे. तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली होती व ते भ्रष्टाचारात गुंतलेले होते, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
















