विजय झालं तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर…. : सुधीर मुनगंटीवार

0

चंद्रपुर(Chandrapur):- चंद्रपुरातून निवडणूक लढवण्यासाठी मी तयारच नव्हतो. पक्षाचा आदेश आला म्हणून तयार झालो. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्र ही येतात. या दोन विधानसभा क्षेत्रात माझा फारसा जनसंपर्क नव्हता. तरीही मी लोकसभेची निवडणूक लढविली. मी आधीपासूनच ठरवले होते,  “विजय झालं तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर खचायचं नाही”, असे सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी म्हटले.

जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीत उभा असून जनतेला वाटलं की, त्यांचे प्रश्न काँग्रेसचा उमेदवार चांगल्याने सोडवू शकतो, तर ते काँग्रेसला निवडून देतील. जनतेने मला संधी दिली तर मी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जिवापाड काम करेन. मात्र, जनतेने संधी दिली नाही तर जनतेला मलाच निवडून द्या, अशी बळजबरी मी करू शकत नाही.

मी चंद्रपूरबद्दल साशंक नाही. मात्र, निर्णय जनतेला घ्यायचा आहे हे विसरून चालणार नाही.पराभव अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पराभव झाला होता.  पराभवानंतर तिघांनी आपले उद्दिष्ट बदलले नाही, नैतिकता सोडली नाही. पराभव झाला तर मी पूर्ण शक्तीने माझ्या क्षेत्रात कामासाठी लागेन, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.