यापुढे राऊतांनी माझं नाव घेतलं तर.. – आ प्रसाद लाड

0

 

नागपूर- संजय राऊत सातत्याने माझा आणि माझ्या कंपनीचा उल्लेख करत आहेत. संजय राऊत यांच्या बोलण्यात कोणत्या गोष्टीचा संबंध नाही, कोणत्या माहितीचा आधार नाही. कशामध्ये नाव घ्यायचं कशात नाही घ्यायचं, हे कळत नाही. अशा माणसाला कोणती संसदीय भाषा वापरली पाहिजे आपल्या माध्यमातून मी संजय राऊत यांना सांगू इच्छितो, याच्यापुढे त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचे नाव घेतलं, तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे हे मी मीडिया समोर आणेल. त्याचे व्हिडिओ जनतेसमोर आणेल आणि मी माझ्या वकिलांशी चर्चा करून, अब्रु नुकसानीचा किमान 200 ते 500 कोटींचा दावा संजय राऊतांवर उद्या सकाळपर्यंत दाखल करतोय.उधळलेल्या रेडकूला भाल्याने मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आक्रमकपणा आला आहे.ज्याने मेहनतीने उभ केलेलं साम्राज्य, खोटारडेपणामुळे त्याला डाग लागत असेल, तर छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे अंगावर आलं तर  शिंगावर घ्यायचं असेही प्रसाद लाड यांनी ठणकावले.