इडा पिडा घेऊन जागे मारबत काय आहे मारबतीचा इतिहास आणि परंपरा…

0
इडा पिडा घेऊन जागे मारबत काय आहे मारबतीचा इतिहास आणि परंपरा…
Ida Pida Gheun Jage Marbat What is Marbat History and Traditions…
मारबत उत्सव म्हणजे नागपूरला (Nagpur) लाभलेला ऐतिहासिक वारसा. यंदाही नागपुरात बडग्या-मारबत महोत्सवाला करण्यात आला आहे. मोठ्या धूम धडाक्यात मिरवणूक काढण्यात येते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नाही. पिवळी मारबत उत्सव गेल्या १४० वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला सुद्धा १४३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे.बैल-पोळ्याच्या म्हणजेच मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्ह्या पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणूक शहरातून काढली जाते. या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे (मोठे पुतळे) तयार केले जातात.

काळी आणि पिवळ्या मारबतीचं महत्त्व

काळी आणि पिवळी मारबतीसह (Kali pili marbat)बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत. महाभारत काळाचा संदर्भदेखील या उत्सवाला दिला जातो.

श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशी प्राचीन काळी मारबत आणि लोकांचं रक्षण करणारी पिवळी मारबत अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात.

इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षा देखील जुना उत्सव मारबत आहे. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या; ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचं प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत.

वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून नष्ट व्हावीत आणि चांगल्या गोष्टींचं स्वागत करण्यासाठी मारबत उत्सव साजरा केला जातो. गेल्या १३७ वर्षा ही परंपरा सुरू आहे.