मुंबई : कॉंग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत आहे.राजकारणात सगळेचं युवा असतात. शरद पवार यांचे वय किती झालं तरी ते युवा आहेत. पक्षनेतृत्वाने विरोधी पक्ष नेतेपदी मला योग्य समजुन त्यासाठी माझी निवड केली मी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन असा विश्वास विरोधी पक्षनेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले या सर्व कॉंग्रेस नेत्यांचे आभारही त्यांनी मानले. वडेट्टीवार म्हणाले,या पदासाठी इच्छुक सगळेच असतात. मला योग्य ठरवल्याबद्दल धन्यवाद. दरम्यान,२०० च्या वर सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ आहे या पार्श्वभूमीवर तुम्ही कसे लढणार, याविषयी बोलताना संख्येने लढाई होत नाही ती विश्वासाने होते असे स्पष्ट केले.काँग्रेस पक्ष श्रेष्ठींमुळे ही जबाबदारी मिळाली.जिद्द असली तर कुठलीही लढाई लढली जाऊ शकते.
भविष्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल याबाबत काही शंका नाही. सरकार चुकते तिथे प्रहार करायचे आपले धोरण असेल असे वडेट्टीवार म्हणाले.













