
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहरातील माजी उपमहापौर, नगरसेवक यांनी केला शिवसेनेत प्रवेश
(Nagpur) नागपूर – पक्ष संघटन मजबूत करणारा नेताच कार्यकर्त्यांना आवडत असतो. याच स्वरुपाचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल करीत आहेत. हिच त्यांची कार्यशैली पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली
दि ०५ मे २०२५ रोजी रविभवन नागपूर येथे नागपूर शहरातील माजी उपमहापौर ,नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यात काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर रघुनाथ मालिकर वॉर्ड क्रम.१३ गोरेवाडा, पुष्पा मालिकर राष्ट्रवादी काँग्रेस, नगरसेवक दिलीप मडावी वॉर्ड क्रम.५४ तेलंगखेडी काँग्रेस, विठ्ठल हेडाऊ वॉर्ड क्र.५५ लेंडीतलाव काँग्रेस, विकास नागभिडे वॉर्ड क्र.१७ बेनाकी वैशालीनगर बहुजन समाज पार्टी, मोरेश्वर धोटे मनसे, योगेश गोंडाणे वॉर्ड क्र.७३ जुनी मंगळवारी, परसाराम बोकडे वॉर्ड क्रमांक ६४ मस्कासाथ उबाठा, भास्कर बुरडे वॉर्ड क्रमांक ५५ लेंडीतलाव उबाठा, रामदास गुडदे वॉर्ड क्रमांक २५ मेहंदीबाग उबाठा, भिमराव मंदनवार उबाठा, नगरसेविका दुर्गा रेहवाडे वॉर्ड क्रमांक ६६ कर्नलबाग, लक्ष्मी बैलतवार वॉर्ड क्रमांक ७३ नारी काँग्रेस, विमल पौणीकर वॉर्ड क्रमांक ३६ तांडापेठ आदिम पक्ष, लक्ष्मी हेडाऊ नाईक वॉर्ड क्रमांक ३५ तलाव जनता दल, जिजा धकाते कॅम्युनिस्ट पार्टी,सह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, उबाठा चे पदाधिकारी चक्रवर्ती रायबोले, आश्विन विंचूरकर, विकास आंबोरे, सिताराम शाहू, प्रभात वर्मा, नितीन काटेकर, विठ्ठल भोंगाडे, आतिश मदने, पंकज शेकोकर, कैलासिंग चौहान, आनंदसिंह पवार, शैलेससिंह मोर्य, दिलीपसिंह पायक, घनश्याम देऊळकर, राधेश्याम पराशर, मीनाक्षी चकोले, सुनील शेलोकर यांच्यासह शेकडो युवकांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भगवे दुपट्टे घालून शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले ” शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्न करीत आहे. शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसाला आपलं भविष्य आता शिवसेनेमध्ये दिसू लागलेले आहे. सर्वसामान्य माणसाला देखिल शिवसेनेमध्ये संधी मिळते.
माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला शिवसेने पाचदा आमदार आणि राज्यमंत्री देखील बनविले आहे. शिवसेनेच्या बळकटीकरणसाठी मी सदैव काम करीत आहे. शिवसेनेत येणाऱ्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्यामागे ताकदीने उभा आहे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे उभे आहेत.”
यावेळी शिवसेना नागपूर शहर जिल्हाप्रमुख बंडू तळवेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजु हरणे, उपजिल्हाप्रमुख अशोक झिंगरे, युवासेना जिल्हाप्रमुख राजेश गोमकाडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शरणांगत, शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष जिल्हाप्रमुख गौरव पनवेलकर यावेळी उपस्थित होते
















