मला निवडणुकीपासून रोखले,रश्मी बर्वे यांचा आरोप

0

 

नागपूर (Nagpur)– माझ्या सारख्या सर्व सामान्य महिलेला न्यायालयाने न्याय दिला न्यायदेवतेचे आभार.हा न्याय मलाच नाही तर माझ्या सारख्या अनेकांसाठी महत्वाचा आहे. विरोधकांनी कट कारस्थान रचून मला निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी रातोरात माझे जात प्रमाणपत्र खोटं ठरवले असा आरोप रश्मी बर्वे यांनी पत्रपरिषदेत केला.या देशात लोकशाही आहे, न्याय देवता आहे म्हणून मला न्याय मिळाला.

मी लोकांमध्ये जो विश्वास निर्माण केला होता तो आज खरा ठरला. मात्र,मी नागपूरच्या बड्या नेत्यांना प्रश्न विचारते की, त्यांनी एका महिलेवर अन्याय होत असताना धृतराष्ट्राची भूमिका का घेतली ? असा सवाल बर्वे यांनी उपस्थित केला. मी कायदेशीर पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.खा नवनीत राणा यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवलं यासंदर्भात बोलताना न्यायालयीन निर्णय मान्य मात्र,भाजपात प्रवेश घेताच त्यांच्यासोबत हा पक्ष उभा झाल्याचे दिसत असल्यावर भर दिला.