

बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी सरकारकडून किती पैसा खर्च होतो, हे तुम्हाला माहित आहे का? हा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानला वाय प्लस (Y+) सुरक्षा पुरविण्यात आली आहे. (Gangster Lawrence Bishnoi)गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या गँगकडून सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. ‘जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदत करणार, त्याला आपला हिशोब तयार ठेवावा लागेल’, अशी धमकी बिष्णोईकडून फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली होती. यानंतर सलमान आणि त्याच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेवर किती पैसे खर्च केले जातात याचा हिशोब थक्क करणार आहे.
सुरक्षेचे प्रकार
सुरक्षेचे प्रामुख्याने सहा प्रकार आहेत. यात X, Y, Y+, Z, Z+ आणि SPG (विशेष संरक्षण गट) यांचा समावेश होतो. पंतप्रधान आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीची आहे. सरकार कोणत्याही व्यक्तीला अतिरिक्त सुरक्षा देऊ शकते. X श्रेणीतील लोकांच्या सुरक्षाव्यवस्थेत एक बंदुकधारी तर Y श्रेणीतील लोकांच्या सुरक्षाव्यवस्थेत दोन बंदुकधाऱ्यांचा समावेश असतो. Y+ श्रेणीअंतर्गत दोन पोलीस अधिकारी आणि एक घराच्या सुरक्षेसाठी असतो. दुसरीकडे Z सेक्युरिटीमध्ये सहा बंदुकधाऱ्यांचा समावेश असतो. तर दोन घराच्या सुरक्षेसाठी असतात. Z+ सिक्युरिटीमध्ये 10 सुरक्षारक्षक आणि घराबाहेर दोन सुरक्षारक्षक असतात.
सलमानच्या सुरक्षेवरील खर्च
एका वृत्तानुसार सलमान खानच्या सुरक्षेवर होणारा खर्च हा कोट्यवधींमध्ये आहे. वाय प्लस सिक्युरिटीसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च होतात. एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर गोळीबार झाला होता. तेव्हापासूनच त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.
अरबाज खानची प्रतिक्रिया
या घटनेनंतर सलमानचा भाऊ अरबाज खान याने एका मुलाखतीत म्हटलंय, “आम्ही ठीक आहोत. आम्ही पूर्णपणे ठीक आहोत असं मी म्हणणार नाही. कारण सध्या कुटुंबात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. अर्थातच प्रत्येकजण चिंतेत आहे. सध्याच्या घडीला आम्ही काय करू शकतो, ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. सलमानच्या सुरक्षेसाठी सर्व पावलं उचलली जात आहेत. प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करतोय. सध्यातरी आम्हाला असंच राहावं लागेल.”