

‘एड’च्या बैठकीत झाली विविध समस्यांवर झाली चर्चा
नागपूर, 4 डिसेंबर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून आकाराला आलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवाअंतर्गत आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड), नागपूर यांच्या समन्वयाने ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ हा उपक्रम राबवला जात असून त्या अनुषंगाने सोमवारी हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरची बैठक हॉटेल अशोका येथे पार पडली.
नागपूर शहर सध्या संक्रमणावस्थेत असून आजुबाजुचा परिसरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासीत होत आहे. त्यामुळे पुढचा काळ हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचा सुगीचा ठरणार असून ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ मुळे या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. नागपुरातील हॉटेल्स आणि निवासाया सुविधांमध्ये 2-3 वर्षात दुप्पट वाढत होणार असून त्यामुळे सुमारे 5000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि 40,000 हून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. त्यामुळे शेकडो कोटींच्या महसुलात वाढ होईल आणि या क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. पर्यटन धोरण, प्रलंबित उद्योग क्षेत्राचे फायदे, हॉटेल्सची अनियंत्रित अव्यवस्थित वाढ, एमपीसीबी आणि त्याचप्रमाणे या विषयांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड)चे अध्यक्ष आशीष काळे, सचिव डॉ. विजय शर्मा यांच्यासह गिरधारी मंत्री, तेजिंदर सिंग रेणु, संजय गुप्ता, दीपक खुराणा, अफजल मिठा, इंद्रजित सिंग, नितीन त्रिवेदी, रोहित कृपलानी, विनित वैद्य, रोहित वैद्य, दयाल मुलचंदानी, नितीन मेहता, संजय अग्रवाल, विजय चौरसिया, तरुण मोठवानी, संजय पालिवाल आदींची उपस्थिती होती.