रक्षाबंधनाच्या निमित्ताने सैनिक बांधवांचा सन्मान

0

नागपूर (Nagpur) — श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था आणि महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज मिल्ट्री कॅन सब ऑफिस, सिटाबर्डी, नागपूर येथे सैनिक बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या भावनिक आणि सन्माननीय कार्यक्रमात सैनिकांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला आदरणीय कर्नल तिवारी सर, राजेंद्र कुमार सर आणि अनेक सैनिक बांधव उपस्थित होते. राखी बांधल्यानंतर सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली, ज्यातून महाराष्ट्राच्या शौर्य आणि संस्कृतीचा गौरव व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लताताई आंभोरे, अध्यक्ष – शांतता समिती, नागपूर यांनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण बहुदेशीय संस्थेच्या संचालिका सौ. संध्या भोयर आणि लताताई आंभोरे यांनी केले.

संस्थेच्या सहकारी सदस्यांमध्ये सौ. सुषमा नागपुरे, जोशीला सोंडवले आणि माधुरी सागवेकर यांचीही उपस्थिती लाभली.

हा कार्यक्रम केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित न राहता, सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता, आदर आणि आत्मीयता व्यक्त करणारा ठरला. सैनिकांचे मन:पूर्वक आभार मानत सर्व उपस्थितांनी राष्ट्रभक्तीच्या या पर्वाला उजाळा दिला.