

नागपूर(Nagpur), 7 जुलै 2024 :- वनराई फाउंडेशनचे विश्वस्त, महाराष्ट्र राज्य वनसंरक्षक व वनपाल संघटनेचे अध्यक्ष , एशियाटीक बिग कॅट सोसायटीचे सचिव आणि बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे ( विदर्भ ) अध्यक्ष अजय पाटील(Ajay Patil) यांना अमेरिकेच्या डब्ल्यूडी विद्यापीठातर्फे ‘मानद डॉक्टरेट’ बहाल करण्यात आली आहे.
अजय पाटील यांनी वनविभागाचे वनमजूर, वनरक्षक, वनपाल यांच्यासाठी केलेले कार्य तसेच, एशियाटीक बिग कॅट सोसायटीच्या माध्यमातून वन्यजीव आणि वनांचे संवर्धनासंदर्भात केलेल्या उपाययोजना तसेच, पर्यावरण रक्षणातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी डब्ल्यूडी विद्यापीठातर्फे त्यांना यांना पर्यावरण अभ्यासक म्हणून हा सन्मान प्राप्त झाला आहे. अजय पाटील यांनी या यशाचे श्रेय वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांना दिले आहे.
वन्य, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून अजय पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.