नागपूर :लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडणे, ती आवडत असल्याची भावना व्यक्त करणे ही कृती विनयभंगाच्या गुन्ह्यात मोडत नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने नोंदवित सदर आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हा निर्णय दिला. धनराज बाबू सिंग राठोड असे। या आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने ऑटोरिक्षा चालक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवला. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. 17 वर्षीय पीडित मुलीने या आरोपीचा ऑटो बंद केला आणि ती बसने शाळेत जात होती. धनराजचे तिच्यावर ऐकतर्फी प्रेम होते मात्र मुलीला तो आवडत नसल्याने ती टाळत होती. 1 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपीने तिला रस्त्यात अडवून गाडीवर बसण्यास सांगितले तिने पुन्हा विरोध करताच त्याने तिचा हात पकडला आणि आपल्याला तू आवडते अशी भावना व्यक्त केली .मात्र,मुलीने दिलेल्या तक्रारीत, जबाबात आरोपीचा लैंगिक हेतू असल्याचे नमूद नाही. पोलिसांनी विशेष सत्र न्यायालयात खटला दाखल केला असल्याने आरोपीला अटक करण्याची गरज नाही असे नमूद करीत उच्च न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडणे विनयभंग नाही !
Breaking news
Breaking news
LOCAL NEWS