बुधवारी अधिवेशनाचे सूप वाजणार

0

नागपूर- नागपुरात सुरु असलेले विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता उद्या बुधवारी होणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
अधिवेशनाच्या कालावधीवर निर्णय घेण्यासाठी बुधवारी दुपारी समितीची बैठक पार पडली. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अधिवेशन आणखी दोन दिवस चालविण्याची मागणी केली होती. मात्र, पुरेसे कामकाज नसल्याने दोन दिवस अधिवेशन लांबविता येणार नाही, अशी भूमिका सरकार पक्षाकडून घेण्यात आली. त्यानंतर उद्या अधिवेशनाची सांगता करण्याचा निर्णय झाला.