

नागपूर(Nagpur), 25 जून : श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीतर्फे ‘पंचमदा’ नावाने लोकप्रिय असलेले संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या 86 व्या जन्मदिनानिमित्त ‘हिट्स ऑफ आर.डी. बर्मन’ हा संगीतमय कार्यक्रम शुक्रवार, 27 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी 6 वाजता होणार्या या कार्यक्रमात आर.डी. बर्मन यांची सदाबहार गाणी गायक कलाकार सादर करतील. सायंटिफिक सभागृह वातानुकुलित झाल्यानंतरचा हा तेथील पहिलाच कार्यक्रम ठरणार आहे. या कार्यक्रमात अतिथी गायिका निकेता जोशी यांच्यासह दत्तात्रय वझरकर, निरजा धांडे, अनिल नायर, सुवर्णा पंत, आशिष पाटील, समीक्षा चरडे, धीरज पारपल्लीवार, हर्षवर्धन वैरागरे, मोहिनी देशपांडे, शशीकांत वाघमारे, श्वेता देशमुख बोरकर, अनघा वैद्य, अंजली खोडवे, स्मिता व्यास आदींचा समावेश राहणार आहे.
गायक कलाकारांना परिमल जोशी, ऋग्वेद पांडे, पंकज यादव, महिंद्र वातुलकर, राजू गजभिये, रितेश त्रिवेदी हे वाद्यवृंद साथ देतील. कार्यक्रमाचे संचालन सुप्रसिद्ध निवेदिका विशाखा पवार करणार आहेत. या नि:शुल्क कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीचे संचालक समीर पंडित यांनी केले आहे.