नागपूर – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडाळकर यांच्या विरोधात दादा गट आक्रमक झाला आहे. आ पडळकरला जोडे मारा, एक लाखांचे बक्षीस मिळवा अशी अफलातून ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज दिली आहे. पडळकर मंगळसूत्र चोर असून, त्याला जोडे मारणाऱ्यास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येईल अशी ही घोषणा आहे.
राज्यात कोणीही जोडे मारले, कपडे फाडले, भर चौकात मारल्यास नागपूर कार्यालयातून एक लाखाचे बक्षीस देऊ असेही पवार यांनी सांगितले. धनगर समाजासाठी आरक्षणाचा देखावा. भाजपचे लक्ष वेधून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका करण्याची त्यांची उंची,लायकी नाही. हे डुकराचे पिल्लू नागपूरला येईल तेव्हा त्याला सोडणार नाही. त्याला त्याची जागा दाखवून देऊ. मंगळसूत्र चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर येथून माहिती काढणार आहोत.आम्ही सक्षम आहोत तुम्ही काळजी करू नका, त्याचे दुकान कसे लावायचे ते चांगले माहित आहे या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ रोहित पवार यांना उद्देशून स्पष्ट केले. युवक काँग्रेसने जोडे मारले लवकरच आम्ही आ गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळू असा इशाराही दिला.













