विकासाची गंगा जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी जातीय जनगणना आवश्यक – संजय गाते

0

पुलगाव- “सरकारच्या विविध योजना जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी जनसामान्याच्या सामाजिक स्थितीची जाणीव असणे आवश्यक आहे. देशामध्ये 1931 नंतर अशी आकडेवारी उपलब्ध नाही इंग्रजांच्या काळात झालेल्या 1931 च्या जातीय जनगणनेनुसारच आजही विविध योजना आखल्या जातात. त्यामुळे जातीय जनगणना करून विकासाची गंगा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. ” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले.

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याच्या स्वागतार्थ पुलगाव येथील टिळक चौक येथे जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या धन्यवाद देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे लाडू वाटपही करण्यात आले.

यावेळी बोलताना संजय गाते यांनी सांगितले की,”जातीनिहाय जनगणना म्हणजे भारतातील लोकसंख्येची जात आणि सामाजिक-आर्थिक स्थितीनुसार गणना करणे होय.

भारतात १८७२ ते १९३१ पर्यंत ब्रिटिश राजवटीत नियमितपणे जातीनिहाय जनगणना झाली.
१९४८ च्या जनगणना कायद्यानुसार, स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना १९५१ मध्ये झाली, परंतु यात जातीआधारित आकडेवारी गोळा करणे थांबवण्यात आले. फक्त अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांची गणना सुरू राहिली.

२०११ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना (SECC) केली, परंतु या जनगणनेची जात-आधारित आकडेवारी सार्वजनिक करण्यात आली नाही.आतापर्यंत उपलब्ध असलेली जातीआधारित आकडेवारी १९३१ च्या जनगणनेवर आधारित आहे.

जातीआधारित जनगणना झाल्यास कोणत्या जाती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत याची अचूक माहिती मिळेल आणि त्यानुसार त्यांच्यासाठी योग्य धोरणे आणि योजना आखता येतील.
सध्याची आरक्षण धोरणे बऱ्याच अंशी जुन्या आकडेवारीवर आधारित आहेत. नवीन जनगणनेमुळे आरक्षणाची गरज आणि व्याप्ती अधिक चांगल्या प्रकारे निश्चित करता येऊ शकेल.

कोणत्या विशिष्ट समुदायाला कोणत्या सरकारी योजनांची गरज आहे हे जातीनिहाय आकडेवारीमुळे समजेल आणि त्यानुसार योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल.
समाजशास्त्रज्ञ, अभ्यासक आणि धोरणकर्त्यांना भारतातील सामाजिक रचना आणि असमानता यांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळेल.

विविध जातींच्या लोकसंख्येचे योग्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी ही आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे.
जातीनिहाय जनगणना हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. अचूक आकडेवारी उपलब्ध झाल्यास, सरकारला अधिक समावेशक आणि न्याय्य धोरणे तयार करण्यास मदत होईल. काँग्रेस सरकारने जातीने जनगणनेला सार्वजनिक होऊ दिले नाही. त्यामुळे विकासाच्या योजना तयार करता आल्या नाही. जनसामान्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही. मोदी सरकारचा हा निर्णय जनसामान्याला न्याय देणारा ठरणार आहे. त्यामुळे मोदी सरकारला आम्ही धन्यवाद देतो.”

स्थानीय स्टेशन चौक पुलगाव येथे भारतीय जनता पार्टी पुलगाव शहराच्या वतीने दि. ३मे ला जातिनिहाय जनगणनेचा निर्णय केल्याबद्दल केंद्रसरकार व यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांचे जल्लोष करुन व मिठाई वितरित करुन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री संजयजी गाते,शहर भाजपा अध्यक्ष श्री प्रशांतजी इंगोले, माजी अध्यक्ष श्री नितीनजी बडगे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री मंगेशजी झाडे, ज्येष्ठ नेते श्री कपिलजी शुक्ला, श्री सुरेशजी सुखिजा, उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी ठाकूर, माजी नप उपाध्यक्ष श्री आशिषजी गांधी, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ माधुरी इंगळे,शहर अध्यक्षा सौ रिता येटीवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्री अली असगर सैफी, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष श्री अनिल लेकुरवाळे सह श्री राजकुमार पनपालिया, मनोज वाल्दे,सूरज सुरस्कार, गुंजन चव्हाण,राजेश गुप्ता, श्री अरविंदजी भार्गव,सौ सोनल दुबे, सौ प्रीती सावसाकडे,निलेश खापरडे, ज्ञानेश्वर कुंभारे, सुमित शहाडे, गणेश पाटणे, महेश मार्कड, प्रफुल मंथनवार, विजय ढगे, सौ शैलजा जांभूळकर, आतिष वर्मा, राजूभाऊ इंगळे, चंदू बेले सह मोठ्या संख्येत कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.