पदवीधर मतदारसंघात यांचा विजय जवळपास निश्चित झाला

0

मुंबई(Mumbai) १ जुलै :- मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब(Anil Parab) यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. अनिल परब यांना आतापर्यंत 44, 791 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली आहेत. ही आकडेवाडी पाहता अनिल परब यांना जवळपास 45 हजार मतांची लीड आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठी लीड मिळाल्याची माहिती मिळत आहे. निरंजन डावखरे यांना तब्बल 58 हजार मतांची लीड मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे मुंबईची पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात ठाकरे गटाला, तर ठाण्याची कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपला यश मिळाल्याचं सध्याचं चित्र आहे. याबाबत आता लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.