

नागपूर (Nagpur) -मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वानिमित्ताने इतिश्री आर्ट्स व रणशिंग, नागपूर निर्मित नाट्य, नृत्य व संगीताची पर्वणी असलेला ‘राम’ या हिंदी नृत्य नाट्य आणि संगीताची पर्वणी असणाऱ्या नाटिकेचा प्रयोग शनिवार, 13 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक 30 कलाकारांचा समावेश असलेली ही नाटिका सायंटिफिक सभागृह (Natika Scientific Auditorium), आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर येथे सायंकाळी 6.30 वाजता सादर होईल. संकल्पना प्रफुल्ल माटेगांवकर यांची असून लेखन व दिग्दर्शन दिपाली घोंगे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन प्रियंका अभ्यंकर व श्रीकांत धबडगांवकर यांचे आहे. शैलेश दाणी व सारंग जोशी यांचे पार्श्वसंगीत नाटकाला लाभले असून नेपथ्य स्वप्निल बोहटे यांचे व प्रकाश योजना किशार बत्तासे यांची आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे