

आ. प्रवीण दटके यांच्या प्रयत्नांना यश
मध्य नागपूर सारख्या दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात शालेय शिक्षण घेणाऱ्या, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकांना तसेच नागरिकांना देखील व्यायाम तसेच खेळाच्या उत्तम सुविधा मिळण्यासाठी शहरातील विविध भागात जावे लागत होते, त्यामुळे मध्य नागपुरात उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आ. प्रवीण दटके शासन स्तरावर प्रयत्न करीत होते. यासाठी मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच क्रीडा मंत्री यांची भेट घेऊन मागणी केली होती.
प्रभाग क्र. 8 टिमकी , हंसापुरी हिंदी प्राथमिक शाळेच्या मैदानावर उच्च दर्जाचे स्विमिंग पुल आणि इनडोअर स्टेडियम बांधण्याकरिता आ. प्रवीण दटके यांच्या प्रयत्नाने रू.30 कोटींच्या कामास मान्यता देण्यात आली आहे
या स्टेडियममध्ये अल्ट्रा मॉडर्न स्विमिंग पूल,एलिव्हेटेड ट्रॅक , वॉकिंग ट्रॅक, टेनिस, विविध खेळांच्या सोयी, अत्याधुनिक जिम आदी उपलब्ध होणार आहे.
मध्य नागपुरातील जनतेने विशेषतः
युवकांनी भविष्यात या स्टेडियमचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. दटके यांनी केले.तसेच या निर्णयाबद्दल आ. दटके यांनी मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि उप मुख्यमंत्री श्री अजित पवारजी सर्वांचे आभार व्यक्त केले.