नाते आपुलकीने समोर केला मदतीचा हात!

0

चिमुकल्या वेधूसाठी नाते आपुलकीने समोर केला मदतीचा हात!

चंद्रपूर(Chandrapur) :समाजातील गरीब,अनाथ,गरजवंत असणाऱ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी नाते आपुलकीचे ही संस्था सदैव तत्पर राहिली आहे,अशाच गरीब आणि असहाय्य असणाऱ्या रा.चोरा,ता.वरोरा, येथील कु.वेधू प्रदीप शेंडामे या चिमुकल्याच्या उपचारासाठी नाते आपुलकीने आणि समाजातील काही दात्यांच्या मदतीने 51 हजारांचा धनादेश संस्थेतर्फे सुपूर्द करण्यात आला.

कु.वेधूला अन्ननलिकेचा आजार झालेला असून तो आत्ता केवळ 7 महिन्याचा आहे,चंद्रपूर येथील डॉ.पालिवाल यांच्याकडे त्याच्यावर दोनदा शस्त्रक्रिया पार पडली पण म्हणावा तसा परिणाम दिसून आला नाही,तेंव्हा त्यांनी नागपूरला श्रीधा हॉस्पिटलला रेफर केले तेथेही त्याच्यावर दोनदा शस्त्रक्रिया पार पडली,वेधुच्या वडिलांनी आपल्या जवळील व इतरांनाकडून कर्ज घेऊन 4-5 लाख रुपये त्याच्या उपचारावर खर्च केले,परिस्थिती हलाखीची असताना एवढा खर्च करताबाकी शेवटी नाईलाजास्तव समाजाकडे मदत मागण्याची वेळ आली.त्यांच्या कठीण प्रसंगात नाते आपुलकीचे व समाजातील काही दात्यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला.

नाते आपुलकीचे संस्थेतर्फे 51 हजारांचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष ताजने, सचिव प्रमोद ऊरकुडे, उपाध्यक्ष किसन नागरकर, कोषाध्यक्ष जयंत देठे,संघटक किशोर तुरानकर, सदस्य राजेश ताजने,सुनील ढवस, रजनी ढुमणे, सुनील खरवडे, दिनेश जीवतोडे, शशिकांत ढुमणे , सुरेश भोयर, सचिन बावणे, मिथुन गोंडे, जगदीश शेडामे उपस्थित होते.नाते आपुलकीचे संस्थेने केलेल्या मदतीचे कु.वेधुच्या कुटुंबीयांनी आभार मानले.