पावसाची जोरदार हजेरी; पिकांचे नुकसान होण्याची भीती

0

 

मुंबई -राज्यात अनेक जिल्ह्यात आज सकाळपासूनच आज ढगाळ वातावरण होते. रविवारी नाशिक,इगतपुरी, धुळे अशा अनेक भागात दुपारच्या वेळी विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना फायदा असला तरी कापूस व इतर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
हवामान विभागातर्फे राज्यातील काही भागात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहण्यास मिळाले होते. दरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विविध ठिकाणी दुपारची एक ते दीड वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शिवाय सकाळपासूनच हवेत देखील गारवा निर्माण झाला आहे.
अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, काढणीला आलेल्या कापूस पिकाचे, त्याचबरोबर भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे